Prithviraj Chavan Saam TV
महाराष्ट्र

Prithviraj Chavan On Pm Modi: नरेंद्र मोदी जवाब दो! त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Prithviraj Chavan News: नरेंद्र मोदी जवाब दो! त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Satish Kengar

Prithviraj Chavan - Pulwama Attack: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांबद्दल धक्कदायक खुलासा केला होता.

आता यावरूनच नागपूर (Nagpur) येथे आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत (Vajramuth Sabha) काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. या 40 जवानांच्या मृत्यूला कोण जवाबदार आहे, याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं, असं ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

पृथ्वीराज चव्हाण या सभेत बोलताना म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान यांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम होतं, ज्यांना चार वेळा राज्यपाल केलं गेलं आणि त्या वेळेचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय जवानांवर जो हल्ला झाला, बॉम्ब स्फोटाने 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याबद्दल काही तथ्य त्यांनी पुढे मांडली.''

ते म्हणाले, ''त्या हल्ल्याची माहिती देत असताना पंतप्रधानांनी राज्यपालांना सांगितलं, तुम्ही चुप्प बसा, बोलू नका. थोड्याच वेळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, तुम्ही शांत राहा. काही बोलू नका आमची काही वेगळी योजना आहे.''

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, ''हजार सीआरपीएफ जवानांना जम्मू येथे घेऊन जायचं होतं. विमानाची मागणी केली, दिलं नाही. 300 किलो स्फोटक घेऊन वाहने शेजारी फिरत होती. सुरक्षा यंत्रणांना कळलं नाही. त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. आज देशातील जनता नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहे. नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जवाब दो!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT