Onion farmers at a market yard in Nashik as NAFED begins direct procurement amid falling prices. saam tv
महाराष्ट्र

नाफेडची थेट बाजार समितीतून कांदा खरेदी, सहकारी संस्थांनाही व्यापारी परवाने मिळणार

Government Clears Hurdles For NAFED Onion Procurement: नाफेड आता थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करणार आहे. या खरेदीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? नाफेडनं थेट बाजार समितीतून कांदा खरेदीला उशीर केला का? यावरचा हा रिपोर्ट..

Girish Nikam

कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना सरकारला अखेर जाग आलीय. नाफेड आणि NCCF आता थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करणार आहे,. त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर करण्यात आल्यात. नाफेड आणि NCCF ने थेट बाजारसमितीतून कांद्याची खरेदी करावी, ही गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. तर दुसरीकडे नाफेड आणि NCCF ने नियुक्त केलेल्या सहकारी संस्थांकडे व्यापारी परवाना नव्हता. त्यांना थेट बाजारसमितीतून कांदा खरेदीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र साम टीव्हीने याबाबत मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर त्यावर तोडगा काढण्यात आलाय.

नाफेड बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

- बाजारसमितीतून कांदा खरेदीसाठी नाफेड आणि NCCF च्या सहकारी संस्थांना व्यापारी परवाने दिले जाणार

- सोमवारपासून नाफेड आणि NCCF कडून थेट बाजारसमितीतून कांदा खरेदीचं नियोजन

- खरेदी केंद्र नसलेल्या मालेगाव आणि येवला तालुक्यात नाफेड आणि NCCF चे अधिकारी थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी प्रक्रिया राबवणार

- बाजारसमितीच्या दर्शनी भागात कांदा खरेदीचे स्थान, दर याचे फलक लावणं बंधनकारक असणार

- शेतकऱ्यांची तक्रार असल्यास आपले सरकार पोर्टलसह लेखी नोंद घेतली जाणार

- गैरव्यवहाराची तक्रार आल्यास केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होणार

मात्र नाफेडच्या कांदा खरेदीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हाच खरा सवाल आहे. मात्र कांदा खरेदीवरुन सरकारची सगळी नौटंकी सुरू असल्याची टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यानी केलीय.नाफेड आणि NCCF च्या जाचक अटी आणि निकष, बाजारापेक्षा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांनी या कांदा खरेदीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे 2 लाख मेट्रिक टनापैकी अवघी 2 हजार क्विंटल कांदा खरेदीच आत्तापर्यंत होऊ शकलीय. रिऍलिटी चेकच्या माध्यमातून साम टीव्हीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कांदा खरेदीतील अटी आणि निकष देखील शिथिल करण्यात आले. मात्र सरकारचें नवे उपाय किती प्रभावी ठरतात हे प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झाल्यानंतरच कळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT