kolhapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: कोल्हापुरात ऊस तोडणी कंत्राटदाराचा खून

सुधाकर चाळक अस खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर: बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे अपहरण करुन कोल्हापूर मध्ये खून (Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुधाकर चाळक अस खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हा खून करुन मृतदेह कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नांगणूर येथील हिरण्यकेशी नदीत फेकूण दिला. शीर धडावेगळं करत ही अमानुष हत्या करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने हा मृतदेह बाहेर काढला आहे. या मृतदेहाचे शीर सापडलेलं नसून त्याचा शोध अद्याप ही सुरूच आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी बीड, मराठवाड्यातून मजूर मोठ्या प्रमाणात येतात. यात आर्थिक देवाण घेवाणीतून वाद होतात. यातूनच हा खून (Crime) झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT