municipal elections saam tv
महाराष्ट्र

Municipal Elections: प्रभाग रचनेचा फायदा कुणाला? प्रभाग रचनेचं गणित काय? नवी प्रभाग रचना छोट्या पक्षांच्या मुळावर?

BMC to Aurangabad: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना जाहीर केली... मात्र त्यामुळे छोट्या पक्षांचं अस्तित्व संकटात सापडण्याची शक्यता आहे... ते नेमकं कसं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

गेल्या 8 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 6 महिन्यात होणार, हे जवळपास निश्चित झालयं. कारण नगरविकास विभागाने राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार होणाऱ्या महापालिकांच्या प्रभाग रचनेबद्दल आणि तिथल्या राजकीय समीकरणांबद्दल जाणून घेऊया...

मुंबई महापालिका

एकसदस्यीय प्रभाग रचना

227 नगरसेवकांचं प्रतिनिधीत्व

15 जागा अनुसुचित जातींसाठी तर 2 जागा अनूसुचित जमातींसाठी

इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू

पुणे महापालिका

4 वॉर्डाचा मिळून एक असे 42 प्रभाग

नगरसेवकाची संख्या 165 होण्याची शक्यता

SC आणि ST साठी 13 टक्के जागा आरक्षित

इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के जागा आरक्षित

प्रभाग रचना भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता

याआधी

2017 ला 41 प्रभागातून 163 नगरसेवक

संभाजीनगर महापालिका

तब्बल 10 वर्षांनी महापालिका निवडणुका होणार

2015 ला 115 वॉर्डमधून 115 नगरसेवक

आता 4 वॉर्ड मिळून एक असे 29 प्रभाग

नगरसेवकाची संख्या 126 ते 128 होण्याची शक्यता

नव्या रचनेमुळे अपक्षांसह छोट्या पक्षांना फटका बसणार

आधीच्या निवडणुकीच्या तुलनेने उमेदवारांना चारपट खर्च करावा लागणार

नागपूर महापालिका

एकूण 38 प्रभाग त्यापैकी 37 प्रभागात 4 सदस्यीय प्रतिनिधीत्व

38 व्या प्रभागात 3 सदस्यीय प्रतिनिधीत्व

2017 प्रमाणे नगरसेवकांची संख्या 151 राहणार

SC साठी 30, ST साठी 12 आणि OBC साठी 42 जागा आरक्षित

कित्येक वर्षं रखडलेल्या महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्यानं राजकीय पक्षांनी प्रभागवार चाचपणीला सुरुवात केलीय. प्रभाग रचना तीन आणि चार सदस्यीय केल्यानं कुणाचा किती फायदा आणि कुणाचा तोटा होणार? हे निवडणुकीनंतर कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT