Jalgaon vote counting clash EVM seals broken allegations saam tv
महाराष्ट्र

Municipal Elections Result: मतमोजणीवेळी राडा, EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

Jalgaon vote counting clash EVM seals broken allegations: जळगाव महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ झाला. काही पक्षांनी आरोप केला आहे की, ईव्हीएम मशीनची सील तुटलं असून निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी मतमोजणीची प्रकिया सुरु आहे. मात्र अशातच जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर आरोप केलाय. या आरोपामुळे मतमोजणीच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित असताना त्यांना काही ईव्हीएम मशीनचं सील तुटलेलं असल्याचं दिसून आलं. यामुळे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला. आरोपानंतर मतमोजणी केंद्रात गोंधळ सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मुख्य निवडणूक निरीक्षक तसंच आयुक्तांनी या घटनेची माहिती घेतली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuit Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किट खल्ल्याने शरिरावर कोणता वाईट परिणाम होतो?

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

BMC Election Result: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार, महायुतीची बहुमताकडे वाटचाल, कोणकोणत्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर?

Maharashtra Mahanagarpalika Election: कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, दिग्गजांना महापालिकेत झटका, राज्यातील १० हायव्होल्टेज लढतीत काय झालं?

SCROLL FOR NEXT