Municipal Election 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

Election Commission Big Decision: राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात.

Priya More

Summary:

  • राज्यातील २० महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

  • महापालिका निवडणुकांसाठी प्राचाराच्या तोफा आज थंडावल्या

  • तरी देखील उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकता

  • निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. सायंकाळी ५.३० पर्यंत प्रचारासाठीचा कालावधी होता. पण प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील उमेदवार प्रचार करू शकणार आहे. कारण निवडणूक आयोगाने त्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. उमदेवार प्रचाराचा कालावधी संपला तरी देखील घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, आज साडेपाच वाजल्यानंतरही उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. तसंच मतदानाच्या दिवशीही उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा असणार आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. फक्त उमेदवाराला कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करता येणार नाही. त्याचसोबत कोणतेही पत्रक न वाटता शांततेमध्ये उमेदवाराला प्रचार करता येईल. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आणखी कालावधी मिळत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

१३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, आचारसंहीता सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार/प्रतिनिधी यांना त्यांचा प्रचार १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यत करता येईल. परंतू १३ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत राजकीय पक्ष/अपक्ष उमेदवार यांना त्यांचा प्रचार घरोघरी जाऊन करता येईल.

मात्र सदर राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवार/प्रतिनिधींना पत्रके वाटून प्रचार करता येणार नाही. दरम्यान, राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT