Prakash Mahajan reignites the Munde-Mahajan family feud with shocking claims about Pramod Mahajan’s murder. Saam Tv
महाराष्ट्र

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

The Political Impact Of The Mahajan-Munde Family: मुंडेंच्या वारशाचा वाद आता थेट प्रमोद महाजनांच्या खूनापर्यंत पोहचलाय.. मात्र या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली? प्रकाश महाजन आणि सारंगी महाजन यांच्यात शाब्दिक वाद का पेटला? प्रमोद महाजनांच्या हत्येमागे नेमकं काय घडलं होतं?

Suprim Maskar

ऐकलतं... महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दोन कुटुंबातील अंतर्गत वाद आता सारंगी महाजनांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात असताना आता सारंगी महाजनांनी यात उडी घेतली.. आणि त्यानंतर मुंडेंच्या वारशाचा मुद्दा चांगलाच पेटलाय..

दरम्यान प्रकाश महाजनांनी प्रमोद महाजनांच्या हत्येचाही मुद्दा उपस्थित केलाय...प्रवीण महाजन हे प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते...काम न करता पैसा मिळाला पाहिजे , सुख मिळालं पाहिजे... या एका भावनेने त्यानी प्रमोद महाजनांची हत्या केली, असा आरोप प्रकाश महाजनांनी केली.... तर प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजनांनी धुडकावून लावलेत....

2006 ला प्रवीण महाजनांनी मोठे भाऊ प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली... त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात कोर्टात साक्ष दिली...त्यानंतर सारंगी महाजन आणि मुंडे कुटुंबात वादाची ठिणगी पडली...पुढे सारंगी महाजनांनी मुंडे बंधू- भगिनींवर जमीन हडप केल्याचा आरोप केला.. आणि वाद आणखी भडकला.

आता सारंगी महाजनांनी मुंडेंच्या वारशांच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडेंवर ताशेरे ओढल्यानंतर प्रकाश महाजन स्वत: पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ मैदानात आलेत.. त्यातच प्रमोद महाजानांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्यानं या प्रकरणाला नवं वळणं मिळालयं... या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंडे आणि महाजन कुटुंबातील संबंध अधिकच ताणले गेलेत.. आता हा वाद इथेच थांबेल की अजून काही नवे खुलासे होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, वाहतूककोंडी फोडण्यासाठी १४२६० कोटींचा मेगाप्लान, वाचा

Shubman Gill: चौकार लगावल्यानंतर शुभमन गिलच्या मानेत का झाल्या तीव्र वेदना? ही परिस्थिती कितीपत असते गंभीर?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Weekly Horoscope: 'या' राशींना शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT