former corporator ravindra dhone of satara muncipal corportaion saam tv
महाराष्ट्र

Satara: खाेटा गुन्हा दाखल केल्याने उद्या नागरिकच रस्त्यावर उतरताहेत : माजी नगरसेवक रवींद्र ढाेणे

कोणी विरोध करत असेल म्हणून लोकहिताची कामे थांबवायची का?, असाही प्रश्न रवी ढोणे यांनी उपस्थित केला.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : काही दिवसांपुर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याशी माझा दुरान्वये संबंध नाही. जी व्यक्ती गुन्हा दाखल करायला पोलीस (police) ठाण्यात गेली होती. तिनेच कायद्याचा गैरवापर केला असून खोटा गुन्हा दाखल करणा-याची चौकशी करुन संबंधितावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रभागातील नागरिक (satara) उद्या (मंगळवार) शांततेच्या मार्गाने मोर्चा (morcha) काढणार आहेत अशी माहिती माजी नगरसेवक रवींद्र ढोणे (ravindra dhone) यांनी दिली. विक्रांत दुबळे यांनी ढाेणेंवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबतची नेमकी माहिती देण्यासाठी आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत ढाेणे बाेलत हाेते. (satara latest marathi news)

माजी नगरसेवक रवींद्र ढोणे म्हणाले, माझ्या प्रभागातील जे मतदार आहेत. त्या मतदारांसाठी मी आमदार शिवेंद्रराजे (shivendraraje bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करतो. कामे चांगल्या दर्जाची होत आहेत. वॉर्डाचा विकास होत आहे. त्यामुळेच काहीजणांना खूपू लागले आहे. त्यामुळे खोटय़ा तक्रारी करणे, खोटे गुन्हे दाखल करणे असा प्रकार सुरु झालेला आहे.

येत्या निवडणूकीत मी निवडणूक लढवत असल्याने विरोध म्हणून सुरु आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी दुसरी बाजू म्हणून मला बोलवायला हवे होते. तसे बोलवलेही नाही. मी ११ तारखेस प्रभागातच नव्हतो. असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने माझ्या वार्डातील नागरिक मंगळवारी मोर्चा काढणार आहेत. लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT