Mumbai Vanrai Baby Kidnapping Saam Tv News
महाराष्ट्र

Mumbai Crime : ११ हजार रिक्षाचालक, लाखो मोबाईल नंबर, हजारो CCTVचा तपास, मुंबईत ३८ दिवसाच्या बाळाचं अपहरण; अखेर...

Mumbai Vanrai Kidnap 38 Days Old Child : अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ १२च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Prashant Patil

मुंबई : मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या ३८ दिवसाच्या लहान बाळाचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे. बाळाचं अपहरण करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला असून बाळाला सुरक्षित आणि सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिलं आहे.

अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ १२च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सहा दिवस अहोरात्र मेहनत करत तब्बल ११ हजार रिक्षा चालक आणि एक लाखाहून अधिक मोबाईल नंबर तसेच हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात वनराई पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी मुंबईच्या मालवणी मालाड परिसरातून चारही आरोपींना अटक केली. सध्या आरोपी हे वनराई पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपींनी यापूर्वी मुंबईत अशा प्रकारे कुठे लहान मुलांची चोरी करून विक्री केली आहे का याबाबत वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT