Vande Bharat Saamtv
महाराष्ट्र

Vande Bharat : मुंबई- नागपूर रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत, ९ तासांत टच्च; भाडं किती अन् थांबा कुठे?

Faster Travel Between Mumbai and Nagpur: मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, सध्याच्या १४ ते २० तासांच्या तुलनेत हा प्रवास केवळ ९ तासांत पूर्ण होणार आहे.

Bhagyashree Kamble

आता मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते नागपूर प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, जिथे सध्या एक्स्प्रेस ट्रेनने प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात, ते अंतर वंदे भारतने केवळ ९ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळपास ५ ते ६ तासांची मोठी बचत होणार आहे.

मुंबई-नागपूर मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार झालेली ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास काही तासात पूर्ण होणार आहे.

मार्ग आणि अंतर

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे अंतर ८३७ इतके आहे. मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी साधारण १५ ते २० तास लागतात. मात्र, हे अंतर आता नऊ तासांत पूर्ण करता येणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांची ५ ते ६ तासांच्या वेळेची बचत होणार आहे.

प्रमुख थांबे

प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल:

वर्धा जंक्शन

बडनेरा जंक्शन

अकोला जंक्शन

भुसावळ जंक्शन

जळगाव जंक्शन

नाशिक रोड

कल्याण जंक्शन

दादर

हे थांबे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

कोच रचना

१ एक्झिक्युटिव्ह एसी कोच

७ एसी चेअर कार कोच

या कोचमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि अत्यंत आरामदायी वातावरणाचा अनुभव मिळेल, ज्यामुळे प्रवास अधिक आनंददायी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT