Mumbai Police  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political crisis : मुंबई पोलिसांनी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना बजावल्या नोटिसा

एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे सरकार यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईत येणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे सरकार यांच्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भाजप कार्यकर्त्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करु नका. आक्षपार्ह फोटो किंवा बॅनर बाजी करू नका, अशा प्रकारची नोटीस पोलिसांनी भाजपचे नेते हाजी अराफत शेख (Haji Arfat Shaikh) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना दिली आहे. तसेच सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडी सरकारचा (mva government) जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलं असून भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून निरर्शने सुरु केली आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT