Police Fir on mns Sandeep Deshpande
Police Fir on mns Sandeep Deshpande  Saam Tv
महाराष्ट्र

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात काल मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांनाही नोटिसा बजावल्या. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या दादरच्या निवासस्थानी शिवतीर्थवर भेट घेतली. त्याचदरम्यान पोलीस बंदोबस्तात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने देशपांडे आणि धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष धुरी यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देत तेथून पळ काढला. देशपांडेही पोलिसांना चकवा देत पळाले. त्यानंतर या गंभीर घटनेची दखल घेत गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देशपांडेंविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अखेर संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केलीय. दरम्यान, मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

संदीप देशपांडे, संतोष साळी आणि संतोष धुरी शिवतीर्थावर (Shivteertha) दाखल झाले होते. यानंतर माध्यमांना प्रतिक्रया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या धडपडीत एका महिला पोलीस कॉन्स्टेबल मनसे (MNS) नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अडवत असताना संतोष धुरी यांनी महिला कॉन्स्टेबलला (Female constable) धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. अशात माध्यमकर्मींच्या गर्दीचा फायदा घेत संदीप देशपांडेंनी यातून पलायन केले. या दोन्ही नेत्यांनी पळ काढल्यानंतर पोलिसांनी इतर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

संदीप देशपांडे कालपासून मंध्यमांच्या समोर येत नव्हते. मात्र आज संदीप देशपांडे, संतोष धुरी संतोष साळी हे अचानक शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता देशपांडे आणि धुरी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेले. मात्र यादरम्यान महिला पोलिसासोबत घडलेल्या घटनेमुळे देशपांडेंच्या अडचणींत वाढ होणार आहे. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही, तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने काही ठिकाणी मनसैनिक (MNS) आक्रमक झाले होते. लाऊडस्पीकर्सचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs RCB,IPL 2024: बेंगळुरुसमोर गुजरातचं आव्हान! पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

Today's Marathi News Live: शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते : संजय राऊत

Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

Success Tips: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? या सवयी महत्वाच्या

SCROLL FOR NEXT