Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट, राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

महाबळेश्वरजवळ इनोव्हा गाडीवर झाड कोसळले; गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे चालक सुखरूप

महाबळेश्वरमधील रांजणवाडी येथे वादळी पावसामुळे रस्त्याकडेचे मोठे जांभळाचे झाड धावत्या इनोव्हा कारवर कोसळले, ज्यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले तरी चालक सुदैवाने थोडक्यात बचावला. स्थानिक गावकऱ्यांनी आणि तरुणांनी तातडीने धाव घेत झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. रांजणवाडीतील युवकांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली असून परिसरात त्यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम..

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 ते 8 जुलैदरम्यान जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे पूरग्रस्त मार्ग टाळावेत तसेच विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात आज ऑरेंज अलर्ट; कणकवली वैभववाडीत जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून कणकवली, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. किनारपट्टी भागातही जोरदार वारे व अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मालवण परीसरात काही ठीकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी व मच्छीमारानी सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नाणेघाटात पर्यटकांची गर्दी; स्वच्छतेसाठी वनविभागाकडून ‘उपद्रव शुल्क’

राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुके, धबधबे आणि गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होत असताना, वाढत्या पर्यटनामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक वनसमितीने ‘उपद्रव शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे.

रिपब्लिकन पक्ष,ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही - मंत्री रामदास आठवले.

रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते.. पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही.. फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंधू अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते..

बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाची संततधार सुरूच

बदलापूर आणि वांगणी परिसरात आजही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरले आहेत. उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालीय. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूरच्या सखल भागात पाणी साचलय. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उल्हास नदी तसंच धबधब्यांवर नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.

पनवेल नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज

नवी मुंबई शहरामध्ये काल मुसळधार पाऊस पडला अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं अशा स्थितीमध्ये आज मात्र पावसाने शंभर विश्रांती घेतलेली आहे या दृष्टीने पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्यात आलेला आहे तसे आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे महापौर आणि आयुक्तांकडून यादृष्टीने खबरदारी घेतली जात आहे

रायगड जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्याच्या सर्वच भागात जोर कायम आहे. काल रात्रीपासून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा आणि कुंडलिका या दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे तर अन्य नद्यांचे पात्र अद्यापही इशारा पातळीच्या खाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आपत्कालीन मदत यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. सध्या पंचगंगा 27 फुटांवरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे.

पालघर जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट

पालघर जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट. रात्रभर पावसाची रिपरिंप असली तरी आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. काल झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजावन विस्कळीत झाले होते. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ .धामणी धरण 27 टक्क्यांनी भरल. जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या पाण्याच्या प्रश्न मिटला. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांना पूर. नागरिकांना सतर्क राहण्याच जिल्हा प्रशासनाचा आवाहन.

उत्तर पुण्यात मान्सून सक्रिय; संततधार पावसाने खरीप हंगामाला दिलासा

उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून, खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मागील २ दिवसापांसून मुंबई आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीतील ५० कुटुंबाचे तडकाफडकी स्थलांतर; नेमकं कारण काय? वाचा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही पावसाचा फटका; घरात साचले पाणी, VIDEO व्हायरल

एकाच कुटुंबातील ५ जण घरातून अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे, पळाले की घातपात? नेमकं काय घडलं?

Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

Petrol Diesel Price Today: 'या' शहरात पेट्रोल ₹८८.६६ तर डिझेल ८४.५६ रुपये; सरकारी कंपन्यांनी दर घटवले का?

SCROLL FOR NEXT