Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'मराठा-ओबीसी संघर्ष दुर्दैवी, सरकारवर कुणाचाही विश्वास नाही', संजय राऊतांचा टोला; सर्वपक्षीय चर्चेचे केले आवाहन

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २२ जून २०२४

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी केली असतानाच याविरोधात लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राज्यसरकारची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबत संजय राऊत यांनी महत्वाचे विधान करत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे. मराठा असतील ओबीसी असतील. आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, असे सरकारने म्हटले होते. त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची? त्यात या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे, तो थांबवण्याचा दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे," असे संजय राऊत म्हणाले.

सर्वपक्षीय चर्चेचे आवाहन

"शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. जरांगे पाटील यांनी सांगितले आहे माझा सरकारवर विश्वास नाही लक्ष्मण हाके देखील बोलत आहेत माझा सरकार वरती विश्वास नाही. सरकारवर विश्वास नसेल तर अशा वेळेला सर्व पक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे," असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

"पेपर लीकविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध, दहशतवादाविरुद्ध असे अनेक कायदे देशात निर्माण झाले. पण गेल्या दहा वर्षात एकही कायदा अंमलात आला नाही फक्त पीएमएलएचा कायदा सोडून. पीएमएलए कायद्याचा व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला बाकी कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही," असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

SCROLL FOR NEXT