Sanjay Raut Yandex
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'कोण कुठून पळून जाईल हे कळेल', विधानपरिषदेच्या निकालाआधी संजय राऊतांचे सूचक विधान

Maharashtra Vidhan parishad Election 2024: या निवडणुकीत नेमका कोणाच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अशातच संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १२ जुलै २०२४

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. विधानपरिषदेच्या मतदानासाठी आमदारांसोबत विधानभवनात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेल आहे. आज लागणार निकाल हा उद्याच्या चार महिन्यात लागणाऱ्या निकाल ठरवणार आहे. आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून जाते हे तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

"मला अजित पवार, शेकापचे जयंत पाटील भेटले, चंद्रकांत पाटील भेटले. महाराष्ट्राच्या राजकारणात घाण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. तोच अधिकार गणपत गायकवाड यांना दिला. याबाबत निवडणूक आयोगात जे गेले आहेत ते योग्य आहे," अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

"आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो मोदींना भेटतो ते आमचे हात धरतात आम्ही अनेक वर्ष काम केलेला आहे एकत्र त्यांचा आमचा वैयक्तिक भांडण आहे का? आम्हाला बघून प्रत्येकाला मागेच फिरावे लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मागच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी येथून पळ काढला होता. आमचे तिन्ही उमेदवार हे व्यवस्थित निवडून येतील. कोण पडेल हे मी सांगू शकत नाही, "असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT