Maharashtra Politics Latest News:  Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: 'मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना, भाजप नगरसेवकाला दिले ४०० कोटी', विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक आरोप!

Maharashtra Politics Breaking News: जिथे कमिशन मिळत नाही तिथं लक्ष देणार नाही. कमिशन मिळत असेल तर एक पाऊल पुढे असं हे सरकार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Gangappa Pujari

सुनिल काळे| मुंबई, ता. २२ जुलै २०२४

'महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणनंतर मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना सुरु केली आहे. ज्यामध्ये चड्डा नावाच्या कंत्राटदाराला ४०० कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला आहे,' असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर मोठा आरोप केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणनंतर मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना सुरु केली आहे. त्यात चड्डा नावाच्या कंत्राटदाराला ४०० कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला आहे. या चड्डाला सोन्याने पिवळा करण्याचा प्रयत्न असून हा चड्डा भाजपचा दिल्लीत नगरसेवक होता, त्यानंतर काही काळ सीबीआयच्या ताब्यात होता," असा मोठा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

"जिथे कमिशन मिळत नाही तिथं लक्ष देणार नाही. कमिशन मिळत असेल तर एक पाऊल पुढे असं हे सरकार आहे, अशी टीका करत पुराने गडचिरोली भागात थैमान घातले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी. पंचनाम्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

"सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांना सहभागी व्हायला लावलेत. आता ते फुलपँटवर आलेत. उद्या ते हाफपँट घालायला सांगतील नाहीतर एक निर्णय घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता हाफपँटवर यायला सांगा, असा उपरोधिक टोला लगावत विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावरुन जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT