Mumbai crime Saam tv
महाराष्ट्र

Mumbai crime: आईच्‍या अंत्‍यविधीच्‍या नावाने मागत होता पैसे; मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

आईच्‍या अंत्‍यविधीच्‍या नावाने मागत होता पैसे; मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

Rajesh Sonwane

सिद्धेश म्‍हात्रे

मुंबई : आई आजारी आहे तिच्या अंत्यविधीसाठी पैसे नाहीत; अशी बतावणी करून पैसे मागत होता. मात्र हा प्रकार लक्षात (Mumbai) आल्‍याने पैसे उकळणाऱ्या भामट्याला मनसे (MNS) सहकार सेनेच्‍या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला. (Breaking Marathi News)

आईच्या आजाराच्या नावावर तरुण मनसे पदाधिकाऱ्याकडून वारंवार पैश्याची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. सदर तरुण फेसबुकवरून मोबाईल नंबर शोधून लोकांना आई आजारी आहे; असे सांगून पैसे घेऊन परत आई वारली अशी खोटी बतावणी करून पैसे लाटत होता. वारंवार पैशांची मागणी करत असल्याने संशय आल्यावर मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला.

आई जिवंत तरीही...

आई जिवंत असताना विजय तीवर हा तरुण नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT