Mumbai News Saam TV
महाराष्ट्र

Mumbai News : कौतुकास्पद! अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीची मोठी कामगीरी; जिद्दीने पार केला माउंट एव्हरेस्ट शिखर

Mount Everest : साईशा आता एवढ्यावर न थांबता रशियातील सर्वांत उंच शिखर असलेला माउंट एलब्रुस सर करणार असल्याची प्रतिक्रिया साईशाचे वडील मंगेश राऊत यांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Mount Everest : नवी मुंबईतील साईशा राऊत या ६ वर्षीय चिमुकलीने आपल्या वडलांसह माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मिशन पूर्ण केल्याची किमया केली आहे. विविध संकटावर मात करत साईशाने केलेल्या या असाधारण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest Mumbai News)

ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतंही शिखर सर करता येते या वाक्याला साजेशी कामगिरी केवळ सहा वर्षीय चिमुकलीने करुन दाखवलेय. साईशा मंगेश राऊत हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपल्या वडलांसह एवरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम केलाय. ज्या वयात लहान मूलं विविध खेळ खेळत असतात त्याच वयात साईशाने एवरेस्ट चढण्याचा निर्धार केला.

यासाठी साईशाने प्रचंड मेहनत घेतली रोज 14 किलोमीटर सायकलिंग 12 किलोमीटर वॉकिंग 1 तास स्विमिंग आणि योगा करत साईशाने स्वतःला खंबीर केले. मायनस 10 ते 20 टेम्परेचरमध्ये रोज 10 किलोमीटरची चढाई करुन साईशाने एवरेस्टला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.

लहानपणापासूनच मोठी स्वप्न पाहणे आणि पूर्ण करण्याची शिकवण साईशाच्या वडिलांनी तिला दिली आहे. त्यामुळे साईशा आता एवढ्यावर न थांबता रशियातील सर्वांत उंच शिखर असलेला माउंट एलब्रुस सर करणार असल्याची प्रतिक्रिया साईशाचे वडील मंगेश राऊत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Rhea Chakraborty : ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला सर्वात मोठा दिलासा, मुंबई हाय कोर्टात नेमकं काय झालं?

मुंबईत भाजप १२५ जागांवर लढणार; शिंदे, अजित पवारांच्या वाट्याला किती? जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर

Maha Navami 2025: महानवमीच्या दिवशी घरात ठेवा 'या' पारंपरिक गोष्टी, मिळेल देवी दुर्गेचा आशीर्वाद

Asia Cup 2025: ...तेव्हाच मी ट्रॉफी भारताला देईन! ट्रॉफी चोर नकवींचा नवीन ड्रामा; घातली विचित्र अट

SCROLL FOR NEXT