Police Bharti 2024: The Police Recruitment Process Starts From Today Know Where and How to Apply Saam Tv
महाराष्ट्र

Police Bharti 2024: तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

Maharashtra Police Recruitment 2024 Process: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. आजपासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Rohini Gudaghe

Mumbai Nashik Police Recruitment 2024

राज्यात काही महिन्यांपूर्वी १७ हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली (Police Recruitment 2024) होती. अखेर सरकारनं भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. (latest Job Update)

ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावं लागणार आहे. 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. यापूर्वी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार (Maharashtra Police) आहे. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस भरती सुरू

नाशिक शहर पोलीस ( Nashik Police Recruitment) आयुक्तालयात रिक्त ११८, नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. राज्यात १७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. मुंबई पोलीसमध्ये (Mumbai Police Recruitment) पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती होत आहे. एकूण ३४८९ पदांसाठी ही भरती जाहीर होत आहे.

policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांच्या पात्रतेचे निकष

  • भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून १०वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. (Online Application For Police Recruitment)

  • उमेदवारासाठी सर्वसाधारण वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ४५० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३५० रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

भरती प्रक्रियेचे स्वरूप

  • भरती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. (Police Recruitment Process)

  • शारीरिक योग्यता चाचणीत उमेदवारानं किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.

  • भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान किमान ४० टक्के गुण मिळविणं अनिवार्य आहे.

  • कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT