kasara ghat accident Saam Tv News
महाराष्ट्र

Mumbai Nashik Highway: कसारा घाटात बसचा थरारक अपघात, मिनी बस ३ वेळा पलटली; २१ जण गंभीर जखमी

Kasara Ghat Accident: मुंबई - नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर मिनी बसचा भीषण अपघात झाला असून, अपघातात २१ जण जखमी तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

मुंबई - नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर मिनी बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात २१ जण जखमी तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं हा धक्कादायक अपघात घडला आहे. बस चालकाचा ताबा सुटल्यानं बस ३ वेळा उलटली. ज्यामुळे मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. कसारा घाटातील चिंतामणवाडी मिनी बस उलटली. मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं मिनी बस उलटली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिनी बस तीन वेळा उलटल्यानं बसमधील प्रवासी गंभीर झाले आहेत. प्रवास करत असलेल्या प्रवाशांमध्ये २१ जण जखमी झाले आहेत. तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखीन किती प्रवासी होते? याचा तपास सुरू आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून सिन्नरला एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते.

अपघातग्रस्त रूग्णांना स्थानिकांनी तातडीनं जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी मिनी बस चालकाचा अपघात घडला कसा? या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आणखीन कुणाचा अपघात घडला आहे का? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: . भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध – छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT