Mumbai Nashik Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Nashik Highway Accident: शहापूर नवीन कसारा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Kasara Ghat Accident: मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

फैयाज शेख, साम टीव्ही

Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने कोंबड्या घेऊन जाणारे दोन टेम्पो, एक पिकअप आणि एका अन्य वाहन एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

जखमींना तातडीने उपचासाराठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्तकार इजहर खान (वय 25) मुस्तापा खान (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मात्र, या अपघातात शेकडो कोंबड्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. या अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्या घेऊन जाणारे दोन आयशर ट्रक हे नाशिकहून (Nashik) मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, नवीन कसारा घाटात हे ट्रक आले असता, पिकअप आणि एका अन्य वाहनाला ट्रकनी धडक दिली.

ही धडक इतकी भीषण (Accident) होती, की यामध्ये चारही वाहने एकमेकांवर आदळली. या भयानक घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले. याशिवाय आयशर ट्रकमधील कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

SCROLL FOR NEXT