Mumbai-Nashik Expressway Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Nashik Expressway: नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

Mumbai-Nashik Expressway Accident: अपघात नेमका कसा झाला याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र जीप चालक दारू पिऊन वाहन चालवत असावा असावा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Accident News:

नाशिक-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पाचपाखाडी येथे एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात बंद अवस्थेत असलेल्या ट्रकला मागील बाजूने जीपची जोरदार धडक बसलीये. सदर घटनेत जीपमधील पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळत्या रूग्णालयात उपचार सुरूयेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये जखमी व्यक्तींना जीपमधून बाहेर काढण्यात आले आणि मुंबईच्या जे जे रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघात नेमका कसा झाला याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र जीप चालक दारू पिऊन वाहन चालवत असावा असावा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणांच्या जीपचा अपघात झाला आहे. सदर घटनेमध्ये जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचे कुटुंबीय देखील चिंतेत आहेत.

नवीन वर्षाच्या सुरूवातीला देखील अपघाताच्या मालिका सुरूच आहेत. बुलढाण्यात काल लात्री मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालीये. जखमींना उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT