Vande Bharat Express at CSMT station as Central Railway announces revised timings for the Mumbai–Nanded route. Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Express : मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा सुधारित वेळ काय?

Vande Bharat Express : CSMT–हजूर साहिब नांदेड–CSMT वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल केला आहे. ही सुधारित वेळ ०३ मे २०२६ पासून लागू होईल, असे मध्य रेल्वेने सांगितलेय.

Namdeo Kumbhar

Revised Timings of Csmt– Hazur Sahib Nanded–csmt Vande Bharat Express : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते हजूर साहिब नांदेड या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, आज मध्य रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे हे सुधारित वेळापत्रक ३ मे २०२६ पासून अंमलात येणार आहे. वेळापत्रकात बदल झाल्यामुळे आता मुंबई-नांदेड या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वंदे भारतच्या वेळापत्रक बदलाची माहिती दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक २०७०६ CSMT-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस आता CSMT वरून दुपारी १३:१० ऐवजी १३:१५ वाजता सुटेल. ही गाडी दादरला १३:२० वाजता, छत्रपती संभाजीनगरला १८:४३ वाजता, जालन्याला १९:३८ वाजता आणि परभणीला २१:२३ वाजता पोहोचेल. नांदेड येथे ही गाडी रात्री २२:२५ वाजता आपला प्रवास पूर्ण करेल. ठाणे, कल्याण, नाशिक रोड आणि मनमाड स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Revised Timings of Csmt– Hazur Sahib Nanded–csmt Vande Bharat Express

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २०७०५ हजूर साहिब नांदेड-CSMT वंदे भारत एक्सप्रेस आता पहाटे ०५:०० ऐवजी ०५:२० वाजता नांदेडवरून सुटेल. ही गाडी परभणीला ०५:५८, जालन्याला ०७:३३ आणि छत्रपती संभाजीनगरला ०८:२३ वाजता पोहोचेल. मुंबईतील CSMT स्थानकावर ही गाडी दुपारी १४:१५ वाजता पोहोचणार आहे. या मार्गावरील मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.

Vande Bharat Express time

इतर गाड्यांच्या वेळेत झालेले बदल -

वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेतील बदलामुळे ३ रेल्वे गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाटलीपुत्र – LTT एक्सप्रेस, MGR चेन्नई आणि धुळे – CSMT या गाड्यांचा समावेश आहे.

१२१४२ पाटलीपुत्र – LTT एक्सप्रेस: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे दुपारी १४:२० वाजता पोहोचेल (आधीची वेळ १४:१०).

२२१८० MGR चेन्नई – LTT एक्सप्रेस: LTT येथे दुपारी १४:३० वाजता पोहोचेल (आधीची वेळ १४:२५).

११०१२ धुळे – CSMT एक्सप्रेस: CSMT येथे दुपारी १४:२५ वाजता पोहोचेल (आधीची वेळ १४:१५).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाडssss... कानाखाली जोरात लगावली; संतापलेल्या नवऱ्याने रागात बायोकाचा जीव घेतला

Tuesday Horoscope: पगार वाढ होणार, ५ राशींच्या अडचणी दूर होणार; वाचा मंगळवारचे खास राशीभविष्य

Mangal Gochar: मंगळ ग्रह राशी बदलताच येणार अच्छे दिन; ४ राशींचं नशीब पालटणार,घरी येणार पैसाच पैसा

गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा...विराट कोहली-अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या दरबारी; VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update:- कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात मिळाला पावसाळ्याचा अनुभव

SCROLL FOR NEXT