Mumbai–Nagpur Expressway : समृध्दी महामार्गावर अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गावर भीषण अपघात घडला. सिन्नरजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये दोन ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री उशीरा समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ भीषण अपघाताची नोंद झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे इनोव्हा क्रिस्टा कार साईड अँगलला जोरदार धडकली. या भीषण अपघतामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालायत दाखल करण्यात आलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील सर्व प्रवाशी रत्नागिरीमधील होते. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळा आणि देवदर्शन करून परत येत होते. समृद्धी महामार्गाने घराकडे परत येत असताना काळाने घाला घातला. त्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य तात्काळ केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दोन जणांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. जखमींचे जबाब घेण्यात आले आहेत. ५ जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
प्रवासी रत्नागिरीमधील होते आणि ते प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. प्रवासातून परत येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित मदतकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. महामार्गावरील अपघातांच्या या सत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महामार्गावरील सुरक्षा उपायांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.