हा आहे, 3 हजार कोटी खर्च करून उभा केलेला पांढरा हत्ती.. म्हणजेच..मुंबईची मोनोरेल... पाऊस पडला की आधी रस्ते वाहतुक आणि लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र आता थेट जमिनीशी संपर्क नसणारी मोनोरेल पावसाच्या फटक्यानं बंद पडलीय.. हा व्हिडिओ पुन्हा पाहा..
अवघ्या पंचवीस दिवसात घडलेली ही दुसरी घटना.. 20 ऑगस्टला घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती... मुसळधार पावसात जेव्हा रेल्वे आणि रस्ते वाहतुक विस्कळीत झाली होती तेव्हा मुंबईकरांनी मोनोरेलचा आधार घेतला..त्यावेळी श्वास गुदमरल्यानं प्रवाशांनी मोनोची काच तोडून मोकळा श्र्वास घेतला होता..आणि ५८२ प्रवासी सुखरूप बचावले होते.. सुदैवानं यावेळी मोनो रेल्वेत 17 प्रवासी होते. त्यावेळी एमएमआरडीच्या स्पष्टीकरणानुसार, अतिरिक्त बोजा पडल्यानं मोनो बंद पडली होती.
पण आज तर प्रवासी संख्या नियंत्रणात असुनही मोनोरेल वडाळ्यादरम्यान बंद पडली.अग्नीशमन दलाच्या मदतीनं १७ प्रवाश्यांची सुटका करण््यात आलेली असली तरी वारंवार होणारे हे तांत्रिक बिघाड नेमके कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होतोय...प्रवाश्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार.? चेंबूर ते सातरस्ता धावणारी ही मोनोरेल म्हणजे पांढरा हत्ती बनला असल्याचं म्हटलं जातंय .मात्र मुंबईकराच्या जिवाशी असा खेळ सुरू राहीला तर हा पांढरा हत्ती पोसावा तरी का..? एकूणच मोनोरेलचा खुळखुळा झालाय, येवढं नक्की..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.