मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच महापौरपदावरून राजकारण तापत चाललंय. पालिका निवडणुकीत ठाकरे-बंधू एकत्र येणार असल्यानं भाजप आणि शिंदे गटानंही जोरदार तयारी सुरू केलीय. महापालिकेत महायुती एकत्र लढणार असली तरी मुंबईत भाजपचाच महापौर होणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शाहांनी यापूर्वीच केलीय. त्यामुळे ठाकरेसेनेनं हात मुद्दा आता उकरून काढत शिंदेंसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत भाजपचा महापौर म्हणजे तो अमराठीच असणार असा दावा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय़. एवढंच नव्हे शिंदेंनाही अमराठी महापौर मान्य असून त्यांनी शाहांसमोर मान हलवल्याचा निशाणाही त्यांनी साधलाय. तर पराभव दिसत असल्यामुळेच मराठी-अमराठी वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा पलटवार शिंदेसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केलाय.
तर दसुरीकडे मुंबईत ठाकरे बंधूंचाच झेंडा फडकणार असून मराठीच महापौर होणार असल्याचा निर्धार ठाकरेसेनेनं व्यक्त केलाय.
ठाकरे बंधूंनी युतीचे संकेत देण्यापूर्वी भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत होता. मात्र ठाकरेंची शक्ती एकवटल्यानंतर आता भाजप धोका पत्करायला तयार नाही, त्यामुळेच भाजप आता महायुतीची भाषा बोलू लागलंय...मात्र महापौर भाजपचाच आणि तोही शाहांच्या पसंतीचा होणार असा नॅरेटीव्ह सेट करण्याची खेळी ठाकरेंनी आखल्याचं दिसतंय. यामुळे अमराठी मतांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता असली तरी शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर महायुती काय रणनीती आखणार याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.