Mumbai Local Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai Local : पावसाळ्यात लोकल धावणार सुसाट; रेल्वेने शोधला भन्नाट उपाय

Mumbai Local News : मध्य रेल्वेने पावसाळ्यात पॉईंट फेलिव्हर्स घटना होऊन नयेत, म्हणून पॉईंट मशीनमध्ये अद्ययावत केली. मध्य रेल्वेवर ओळखल्या गेलेल्या २३१ पूर-प्रवण ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्यानंतर अनेकदा पॉईंट फेलिव्हर्सच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. मात्र, आता मध्य रेल्वेने पावसाळ्यात पॉईंट फेलिव्हर्स घटना होऊन नयेत, म्हणून पॉईंट मशीनमध्ये अद्ययावत केली. मध्य रेल्वेवर ओळखल्या गेलेल्या २३१ पूर-प्रवण ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे.

पावसाळ्यात रेल्वेच्या पॉइंट बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीत अनेकदा व्यत्यय येतो, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि ट्रेनचे वेळापत्रक कोलमडून पडते. हा बिघाड मुख्यता पॉइंट मशीनमध्ये पाणी शिरल्याने होते. या पॉइंट बिघाड होण्यास कारणीभूत असलेल्या सामान्य घटकांमध्ये पाणी व्यत्यय, केबल दोष, पॉइंट मशीन खराब होणे आणि इनडोअर सर्किट दोष यांचा समावेश होतो. पूर परिस्थितीत एकाच वेळी अनेक बिघाड व्हायचे, ज्यामुळे परिस्थिती रेल्वेसाठी आव्हानात्मक होत होती. त्यांमुळे रेल्वेने म्हणून पॉईंट मशीनला अद्ययावत करण्यात आले आहे

पॉइंट मशीनच्या डिझाइमध्ये आधुनिक सुधारण्या करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे पाण्याच्या संपर्कामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याव्यतिरिक्त, पॉइंट मशीनचे कव्हरमधील बदल अंतर्गत विकसित केले आहेत. ज्यामुळे बिघाडापासून संरक्षण आणि सेवा सुरळीत राहतील. यंदा मध्य रेल्वेने या नाविन्यपूर्ण सुधारणांसह एकूण २३१ पूर प्रवण ठिकाणी पॉइंट मशीन्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पावसाळ्याशी संबंधित पॉइंट बिघाड कमी करण्यात आशादायक परिणाम दिसून येत आहेत.

इतर पायाभूत सुविधा

साचलेले पाणी उपन्यासाठी १९२ पंप सज्ज

विक्रोळी-कांजूरमार्ग, कांजूरमार्ग आणि शीव येथे आणखी ३ ठिकाणी लहान बोगदा.

कुर्ला-ट्रॉम्बे, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार-लोकमान्य टिळक टर्मिनस, आणि टिळक नगर येथे सर्व १५६ कल्व्हर्ट स्वच्छ केले गेले.

ओव्हर हेड वायर जवळील ६,००० हून अधिक झाडांच्या फांद्या छाटल्या, १६,००० इन्सुलेटर साफ केले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT