Mumbai Gorakhpur Godan Express bogie catches Fire Latest News SAAM TV
महाराष्ट्र

Godan Express Fire : मुंबईहून निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग; नाशिकजवळ थरारक घटना, प्रवाशांची पळापळ

Godan Express Fire at Nashik : मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग लागली.

Nandkumar Joshi

तबरेज शेख | नाशिक प्रतिनिधी, साम टीव्ही

Mumbai - Gorakhpur Godan Express Fire :

मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग लागली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे प्रवाशांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ (Nashik Road Railway Station) आज, शुक्रवारी (ता. २२ मार्च) गोदान एक्स्प्रेसच्या (Mumbai - Gorakhpur Godan Express) डब्याला आग लागली. ही एक्स्प्रेस मुंबईहून गोरखपूरकडे जात होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. आग लागल्याने एक्स्प्रेस (Express Train) थांबवल्याचे समजताच प्रवाशांची धावपळ उडाली.

प्रवासी भेदरले

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रवासी आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. डब्यातून आगीचे लोळ (Fire News) आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे एक्स्प्रेसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते.

ही आग पार्सल बोगीला लागली होती. या डब्यात लाखो रुपये किंमतीचा माल होता. तो संपूर्ण जळून खाक झाला आहे. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नाशिकरोड पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT