Kokan Express Way Saam Tv
महाराष्ट्र

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Konkan travel Ganeshotsav highway news : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि महाड दरम्यान लोणेरे गावाजवळ असणारा पूल सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

  • गणेशोत्सवात कोकण प्रवास सुलभ, लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

  • मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे पूल सुरू, चाकरमान्यांना दिलासा

  • लोणेरे पुलामुळे माणगाव-महाड प्रवास सुकर, गणेशोत्सवासाठी ग्रीन सिग्नल

  • कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, लोणेरे पूल गणेशोत्सवापूर्वी खुला

Mahad Managaon traffic jam solution : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण मागील दशकभरापासून मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्णपणे तयार झाला नाही. त्यामुळे कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने परवड होते. हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, त्यामुळे माणगाव आणि महाड यादरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे. (Lonere bridge opening before Ganeshotsav)

मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत कोकणकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील उड्डाण पुल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. माणगाव आणि महाडच्या दरम्यान असलेल्या या पुलाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. यामुळे याच परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. या वर्षी या भागात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी तात्पुरती खुली केली जाणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाहतूक कोंडीतून कायमची सूटता कधी होणार?

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि महाड दरम्यान लोणेर हे गाव येते. येथे दोन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. पुल मध्यभागी आणि दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड अशी या ठिकाणी रचना आहे. दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड अरूंद आहेत. यामुळे या ठिकाणी बॉटल नेक सारखी परिस्थिती निर्माण होते. महाड अगर माणगावकडून येणारी वाहतूक अरूंद सर्व्हिस रोड आणि पूलाच्या बांधकामामुळे आडते. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून हा पुल खुला झाल्याने सुटका होणार होणार आहे. (Ganeshotsav special travel route updates in Konkan)

मुंबई-गोवा महामार्गाचे काम कुठपर्यंत?

मुंबई गोवा महामार्गाचे रायगडच्या हद्दीपर्यंत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. माणगाव आणि इंदापूर बायपास, नागोठणे, कोलाड येथील पूल आणि रस्त्याची काम आर्धवट आहेत. मागील दशकभरापासून या महामार्गाचे काम सुरू आहे. डेडलाइनवर डेडलाइन गेल्या, सरकार बदलले पण कोकणसाठी महत्त्वाचा असणारा महामार्ग काही अद्याप सुरू झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT