MUMBAI-GOA HIGHWAY TRAFFIC JAM: saam tv
महाराष्ट्र

कोकणवासियांच्या प्रवासात खड्ड्यांचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गांवर वाहतूक कोंडी

Ganeshotsav Rush Hits Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्याप सुरूच आहे. अशातच गणेशोत्सवासाठी मूळगावी निघालेल्या कोकणवासियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई-गोवा महामार्गावर नेमकी काय परिस्थिती आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचे विघ्न कोकणवासियांसमोर आलंय. रायगडमधील इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 5 ते 6 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागताहेत. महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय. खड्डे आणि अपूर्ण बाह्यवळण रस्त्यांमुळे कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय...

तर दुसरीकडे, रस्ते वाहतुकीवरून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असताना रेल्वे वाहतूक प्रचंड विलंबाने सुरूय. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं असून जबलपूर एक्सप्रेस तब्बल 11 ते 12 तास उशिरा दाखल झालीये. तर इतर गाड्याही दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत... यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा मनस्ताप होतोय...

पुणे, मुंबई, ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाच्या दिशेने रवाना झालेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांचे विघ्न यंदाही टळलेलं नाहीये. त्यामुळे कोकणवासियांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नुकतीच महामार्गाच्या कामाच्या दिरंगाईबद्दल जाहीर खंत व्यक्त केली होती. दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचं विघ्न कधी दूर होणार?... हाच खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT