Parshuram Ghat Traffic Saam Tv
महाराष्ट्र

Parshuram Ghat Traffic : मुंबई-गोवा हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला

Mumbai Goa Highway: परशुराम घाटातील वाहतूक सुरु झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

Ratnagiri News: मुंबई- गोवा महामार्गावरुन (Mumbai-Goa Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरील परशुराम घाट (Parshuram Ghat) गेल्या काही दिवसांपासून बंद होता. पण आता हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या घाटातील वाहतूक 25 एप्रिल 2023 पासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. पण 11 मे म्हणजे आजपासून हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत होता. पण आता हा घाट पुन्हा सुरु झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने महामार्ग बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 25 एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत या घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती.

परशुराम घाट हा एकूण पाउणे तीन किलोमीटरचा असून यापैकी फक्त 500 मिटरचे चौपदरीकरणाचे काम शिल्लक राहिलेले होते. शिवाय दीड किलोमीटरच्या सुरक्षा वॉलला भरावही करायचा असल्याने हा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. जर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नसते तर या घाटातून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT