"Heavy security deployed in Mumbai ahead of Ganesh Visarjan after terror threat message raises alarm" Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Ganesh Visarjan: गणेश विसर्जनावर दहशतवादी हल्ला? दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पुन्हा मुंबई?

Terror Threat During Ganesh Visarjan in Mumbai: मुंबईत गेल्या 10 दिवसापासून गणेसोत्सवाची धूम आहे. परंतू आता विसर्जनाला ग्रहण लागलंय. होय. मुंबईत विसर्जन मिरवणूकीवर हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आलीये.

Omkar Sonawane

अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जनाचा एकीकडे सर्वसामान्यांमध्ये उत्साह संचारलेलाय तर दुसरीकडे पोलिसांचं टेन्शन मात्र वाढलंय. कारण मुंबईतल्या गणेश विसर्जन सोहळ्यावर दहशतवादी हल्ला होण्याची भितीये होय मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप नंबरवर आलेल्या मेसेजनं सगळ्यांची झोप उडवलीये. या मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय. पाहा,

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी

भारतात 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले

मुंबईत 26/11 हून मोठ्या हल्ल्याचा दावा

34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्बस्फोट करण्याचा मेसेज

400 किलो RDXचा वापर करण्याचा आणि 1 कोटी मुंबईकर टार्गेट असल्याचा दावा

भारतात 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले असून मुंबईमध्ये पुन्हा 26/11 हून मोठा हल्ला होणारेय. 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्बस्फोट करुन होणारेयत. यासाठी 400 किलो RDXचा वापर करण्यात येणारेय. यामुळे 1 कोटी मुंबईकर टार्गेटवर आहेत.

मुंबईला बेचिराख करणारा हा मेसेज आल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झालीये. कारण मुंबईतील विसर्जनाला लाखो लोकं रस्त्यावर येत लाडक्या बाप्पाला निरोप देतात. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांचे टेन्शन वाढलंय.

मुंबईत आजवर अनेक दहशतवादी हल्ले झाले परंतू विसर्जन मिरवणूका कायम जोरदार आणि निर्भय झाल्या. यंदा या गणेश विसर्जनावेळी ही धमकी आल्यानं पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत केलीये.

मुंबईत विसर्जनावर AI ची नजर

विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच AIचा वापर

12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 डीसीपी, 61 एसीपी

3000 अधिकारी 18 हजार पोलीस कर्मचारी तैनात

राज्य राखीव पोलीस दलाच्या 14 तुकड्या

चार शीघ्र कृती दलाच्या तुकड्या, 3 दंगल नियंत्रण पथक

10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची विसर्जनावर नजर

मुंबईतला सगळ्यात मोठा उत्सव साजरा होणारेय. त्यामुळे जगाचं लक्ष उद्या मुंबईकडे असेल. या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो लोकं आपल्या मुलांबाळांसह मुंबईतील रस्त्यांवर उतरतील. जरी या धमकीमुळे टेन्शन वाढलं असलं तरी आपला आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवून आपण आपल्या सुरक्षेसाठी त्यांना सहकार्य करावं आणि

हा सण निर्धास्तपणे जोषात साजरा करावा.कारण हा उत्सव विघ्नहर्त्याचा असून तोच या नाठाळांच्या माथी काठी हाणण्यास सक्षमये. म्हणून निर्धास्त व्हा...म्हणा, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT