Mumbai crime news  saam tv
महाराष्ट्र

Mumbai Crime News: विदेशी महिलेला पाहून हॉटेल मॅनेजरला सुचली दुर्बुद्धी! मग कोर्टाने शिकवला चांगलाच धडा

Mumbai News: पेरूची नागरिक असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात कोर्टाने अवघ्या दोन महिन्यात हा निकाल दिला आहे.

Chandrakant Jagtap

>>सचिन गाड, साम टीव्ही

Court sentences two years jail for molesting foreign tourist : विदेशी महिलेच्या रूममध्ये घुसून सेल्फी काढण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग करणाऱ्या हॉटेल मॅनेजरला कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पेरूची नागरिक असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात कोर्टाने अवघ्या दोन महिन्यात हा निकाल दिला आहे.

भारत फिरायला आलेल्या महिलेसोबत आरोपी रियाझ अहमद राजू अहमद याने गैरवर्तन करत तिच्या विनयभंग केला होता. दोन महिन्यांपूर्वी २६ मार्च रोजी हॉटेल वेलकम येथे ही घटा घडली होती. या प्रकरणात भायखळा पोलिसांनी गुन्हा घडल्याचा अवघ्या २४ तासात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

दोन महिन्यांपूर्वी पेरू येथील पर्यटक महिला भारत फिरण्यासाठी आली होती. येथे ती हॉटेल वेलकम येथे थांबली होती. परंतु तेथील हॉटेल मॅनेजर असलेल्या आरोपीने मदतीच्या नावाखाली या महिलेच्या रूममध्ये प्रवेश केला आणि सेल्फी काढण्याच्या नावाखाली महिलेशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला.

पीडित महिलेला केवळ स्पॅनिश भाषा येत होती. त्यामुळे तिने हॉटेलमधील दुसऱ्या एका स्पॅनिश भाषा येत असलेल्या गेस्टची मदत घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गूगल ट्रांसलेटरच्या मदतीने महिलेशी संवाद साधला आणि तिची तक्रार नोंदवून घेतली.

पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी विनयभंग केल्या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली. आरोपी मॅनेजर त्याचे उत्तर प्रदेशमधील मूळ गाव वजीरगंज येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका दिवसात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच न्यायालयाला विनंती करून महिलेची साक्ष देखील नोंदवण्यात आली होती. (Breaking News)

यानंतर अवघ्या दोन महिन्यात माझगाव न्यायालयाने आरोपीला 2 वर्षांची शिक्षा आणि ५००० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची कैदेची दिली शिक्षा आरोपीला देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT