देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप  SaamTvNews
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप

भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका निवडणूका जवळ येत असताना, काँग्रेस पक्षातर्फे आज उल्हासनगर मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

हे देखील पहा :

भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर ते फडणवीस आहेत असा शाब्दिक प्रहार जगतापांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीसांनी कधीच महाराष्ट्र आणि मुंबई साठी काही केले नाही. मोदींना खुश करण्यासाठी महाराष्ट्र मधील फायनांशियल सेंटर गुजरात मध्ये पाठवलं. नितीन गडकरी मोठं मोठ्या गोष्टी करतात. मात्र, जेएनपीटी मधील महत्वाचा भाग असणारे ट्रान्सपोर्टेशन गुजरात मध्ये पाठवण्यात आलं. तर, जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा मोठा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. मात्र, त्यांना जनतेने पळवून लावलं असून फडणवीस यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेत तुफान राडा; शिवसेना-भाजप नगरसेवक एकमेकांवर धावले, परिसरात बंदोबस्त वाढवला|VIDEO

BCCIकडून राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजरवर कारवाई; डगआऊटमध्ये मोबाईल वापरणं भोवलं!

Satara Tourism : मराठा साम्राज्याचा अभिमान, साताऱ्यातील 'या' किल्ल्यावरून दिसतो कोकण किनारा

Maharashtra News Live Update: परभणीत तीव्र उन्हाचा कहर, पारा पोहचला 42 अंशांवर

चंद्रपूर हादरलं! १५ वर्षांपासूनचे प्रयत्न थकले, शेवटी हरले; ५ आदिवासी शेतकऱ्यांनी एकाच वेळी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT