Borivali railway station woman falls down Saam Tv News
महाराष्ट्र

चालत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरला, प्लॅटफॉर्म-रेल्वेच्या मधोमध महिला अडकली, तेवढ्यात...; थरारक Video

Mumbai Borivali Railway Station : मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उतरण्याच्या नादात तिचा तोल गेला.

Prashant Patil

मुंबई : मुंबई दररोज लाखो लोक रेल्वेने तथा लोकलने प्रवास करत असतात. परंतु अनेक वेळा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे ते अपघातांना बळी पडत असल्याचं देखील दिसून येतं. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात ज्यात लोक चालत्या ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना तोल गमावतात आणि अपघाताला बळी पडतात. त्यांचा हा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उतरण्याच्या नादात तिचा पायरीवरुन पाय घसरला. यावेळी तेथे तैनात असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत तिला बाहेर ओढलं आणि तिचा जीव वाचवला.

या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ एक्स (ट्वीट)वर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती महिला धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. परंतु उतरत असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला, ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये असलेल्या जागेत अडकली. तेवढ्यात रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेतली आणि त्या महिलेला बाहेर ओढलं. या पोलिसाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला आहे आणि या महिलेचे प्राण वाचले.

रेल्वे मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रातील बोरिवली रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एक खाली महिला पडली. तेथे उपस्थित रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवत तिला वाचवलं. कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT