महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरीला ऊत आलाय.. नाशिकमध्ये एबी फॉर्मची पळवापळवी समोर आलीय... हे कमी होतं की काय मुंबईतील सायनच्या वॉर्ड क्रमांक 173 मधून उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या इच्छुकानं थेट पक्षासोबतच निवडणूक आयोगालाही गंडवलंय....
प्रतिक्षानगरमधील वॉर्ड क्रमांक 173 मधून भाजपचा दत्ता केळुस्करांना एबी फॉर्म
जागा वाटपात वॉर्ड क्रमांक 173 शिंदेसेनेसाठी सोडला
शिंदेसेनेकडून माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून केळुस्करांकडे एबी फॉर्म परत करण्याचा आदेश
केळुस्करांनी फॉर्म परत करण्याआधी कलर झेरॉक्स काढली
खरा फॉर्म साटम यांच्याकडे परत केला
मात्र कलर झेरॉक्सच्या आधारे शिल्पा केळुस्करांनी भाजपसह अपक्ष अर्ज भरला
आयोगानं शिल्पा केळुस्करांचा अर्ज वैध ठरवलाय
हे सगळं घडल्यानंतर पुलाखालून दोन दिवस पाणी वाहून गेलं... मात्र केळुस्करांची ही खेळी उघड झाली ती भाजपमधीलच नाराज पदाधिकारी विजय पगारे यांच्यामुळे..... कारण विजय पगारेंच्या पत्नीनं अपक्ष अर्ज दाखल केला.. मात्र केळुस्करांच्या फॉर्मवर पगारेंनी आक्षेप घेतला.. आणि केळुस्करांच्या कारनाम्याचा भांडाफोड झाला...
यानंतर अमित साटम यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेत शिल्पा केळुस्करांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केलीय... त्यामुळे पक्षासोबत निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या केळुस्करांवर काय कारवाई होणार? याबरोबरच एबी फॉर्मची कलर झेरॉक्सही वैध ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरलं जाणार का? याचीच उत्सुकता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.