महाराष्ट्र

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

Sahyadri Sion Pratishthan Distributes Educational Kits: सह्याद्री सायन प्रतिष्ठानने खेड तालुक्यातील काशेडी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. एका अर्थपूर्ण सामाजिक उपक्रमाद्वारे शहरी व ग्रामीण समुदायांमधील बंध अधिक दृढ केले.

Bharat Jadhav

शहर आणि गाव यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते जपत मुंबईच्या सायन येथील सह्याद्री सायन प्रतिष्ठानने खेड तालुक्यातील कशेडी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. कशेडी गावाचे मूळ रहिवासी विश्वनाथ खळे यांच्या माध्यमातून गावाशी जुळलेल्या नात्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी गावाला भेट देणाऱ्या मित्र परिवाराने यंदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा संकल्प करत स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

"गावकऱ्यांकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी याची ही छोटीशी परतफेड आहे," अशी भावना मित्र परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून ग्रामस्थांनी या सामाजिक पुढाकाराचे स्वागत करत मित्र परिवाराचे कौतुक केले. या उपक्रमात विश्वनाथ खळे, संगम कोळी, दुर्वेश गावंड, निलेश सोलकर, महेंद्र केणी, अक्षय रेवाळे, सुशांत रेवाळे, प्रशांत बामणे आणि सूरज बंगाल यांनी सहभाग घेतला. शिक्षणासाठी केलेली छोटी मदतही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठी ठरते, याचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabharata: भगवान श्रीकृष्ण यांनी कोणाला दिला होता दुर्गंधी येण्याचा श्राप?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरवलं, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Maharashtra News Live Update: काँग्रेसचे नाशिकमध्ये आजपासून १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Peri Peri French Fries Recipe: रेस्टॉरंटस्टाईल कुरकुरीत पेरी-पेरी फ्रेंच फ्राईज बनवा घरच्या घरी;वाचा सोपी रेसिपी

Anti Aging Tips : स्किनकेअर नाही, महागडे ट्रीटमेंटही नाही! 44 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी 8 सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT