Assistant Police Inspector Ashwini Bidre killed case Convict Abhay Kurundkar  Saam Tv News
महाराष्ट्र

Ashwini Bidre Case : मृतदेहाचे तुकडे करुन वसईच्या खाडीत फेकले; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला, ११ एप्रिलला शिक्षा सुनावणार

Ashwini Bidre Murder Case Verdict : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यालाच मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरवले आहे.

Prashant Patil

मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला असून पनवेल सत्र न्यायालयाने तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यालाच मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरवले आहे. येत्या ११ एप्रिल रोजी कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. तर आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

मुळची कोल्हापूरची असलेल्या अश्विनी बिद्रे यांचे राजू गोरे यांच्याशी २००५ साली लग्न झाले. पोलीस अधिकारी होण्याचे त्यांचे लहानपणापासून स्वप्न होते. कठोर परिश्रम घेऊन त्यांनी ते स्वप्न सत्यातही उतरवलं. पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर पहिलीच पोस्टिंग त्यांना पुणे येथे मिळाली. तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांची सांगलीत बदली झाली. पती राजू गोरे आणि अडीच वर्षांच्या मुलीसह त्यांनी सांगलीत राहून काही काळ नोकरी केली. मात्र, दरम्यानच्या काळात सांगलीतच अभय कुरुंदकर या पोलीस अधिकाऱ्याशी तिची ओळख झाली. पुढे काही दिवसांत मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे अश्विनी यांची बदली रत्नागिरीला झाली. असं असतानाही १७० किलोमीटर प्रवास करून अभय अश्विनी यांना भेटायला रत्नागिरीला जायचा.

दुसऱ्या लग्नासाठी कुटुंबाला सोडलं

लग्नानंतरच्या नऊ वर्षांनी म्हणजेच २०१४ साली मला तुमच्यासोबत राहायचं नाही, असं अश्विनी यांनी पती राजू गोरे यांना सांगितलं. राजू गोरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होतं की, 'मला अभयशी लग्न करायचं आहे, असं सांगत तिने लग्नाचा बाँडपेपर दाखवला होता. ठरल्यानुसार ती वेगळीही राहायला लागली. तीन ते चार महिन्यातून ती मुलीला पाहायला यायची, परंतु नंतर तर मुलीचीही आठवण तिला येत नसे'.

पुढे अश्विनी नवी मुंबईत एका फ्लॅटवर राहायला गेल्या होती. त्यानंतर अभयचे तिथं येणं जाणं वाढलं. दरम्यानच्या काळात त्यांचे लग्नावरून वाद वाढले होते. तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळी हो, आपण लग्न करू, असं अभयने अश्विनी यांना सांगितलं होतं. त्यामुळे त्याचं ऐकून अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध संपवले होते. परंतु आता मात्र अभय दिलेलं वचन पाळत नव्हता. मी माझ्या बायको-मुलांना सोडू शकत नाही, असं कारण त्याने सांगितलं होतं. मात्र, अश्विनी यांवी लग्नाचा तगादा लावल्याने अभय त्रासला होता. यातूनच अभयने त्यांची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे त्याने वसई-भाईंदरच्या खाडीत फेकले.

जेव्हा अश्विनीच्या नवऱ्यानेच बायकोच्या प्रियकराविषयी माहिती दिली

पोलिसांनी ज्यावेळी अश्विनी यांचे पहिले पती राजू गोरे यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी अभयसोबतच्या अश्विनी यांच्या नात्यावर भाष्य केले. तिथून तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर अभयने पोलीस चौकशीत लग्नासाठी तगादा लावल्याने हत्या केल्याचं कबुल केलं. पोलिसांना अश्विनी यांच्या लॅपटॉपमधून अभयसोबतच्या भांडणाचा एक व्हिडीओ मिळाला. संबंधित व्हिडीओमध्ये अभय अश्विनी यांना मारहाण करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT