Muktainagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar Accident : भरधाव डंपरने एकाला चिरडले; गाळ उपसून नेताना नदीपात्राजवळच घडली घटना

Muktainagar News : खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर, हायवा यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जात आहे.

Rajesh Sonwane

मुक्ताईनगर (जळगाव) : पूर्णा नदीपात्रातून  सध्या गाळ काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान गाळ वाहून नेणाऱ्या एका भरधाव डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे घडली.

निमगाव (ता. संगमनेर) येथील संदीप कैलास जोंधळे (वय ४३) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Jalgaon) खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर, हायवा यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जात आहे. दरम्यान नदीपात्रातून गाळ घेऊन मुक्ताईनगरकडे (Muktainagar) भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने नदीपात्राजवळच संदीप जोंधळे यांना चिरडले. यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. 

रात्रंदिवस चालतात डंपर 

काही डंपर (Accident) मालकांकडे गौणखनिज उपशाची परवानगी असली तरी बहुतांश डंपर्स हे रात्रदिवस गाळ उपसा करून तो वीटभट्टी मालक अथवा शेतकऱ्यांना विकत आहेत. दरम्यान मुक्ताईनगर तहसीलदारांकडे अवैध उत्खनन थांबविण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, राजकीय वरदहस्ताने अवैध गौणखनिज वाहतुकीवर कोणतेही कारवाई झालेली नाही. यामुळे नदीपात्रात डंपर्सची सातत्याने ये-जा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT