Ladki Bahin Yojana Update Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहिणी संतापल्या, थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या

angry women storm collector office in hingoli: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला.

Priya More
  • हिंगोलीत लाडकी बहीण योजनेवरून महिला आक्रमक

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने महिला संतर्त

  • ई-केवायसी करूनही पैसे जमा झाले नाहीत

  • लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

संदीप नागरे, हिंगोली

ई-केवायसी केली, सगळं काही केलं तरी पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. संतप्त लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आणि योजनेचा लाभ का बंद केला? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत राज्य सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. ईकेवायसी अपडेट करून देखील गेल्या तीन महिन्याचे ४५०० रुपयांचे अनुदान खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लाडक्या बहिणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ का बंद केला याचा जाब विचारला. या मार्चाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

दरम्यान यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन कळवतो असं आश्वासन हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी या लाडक्या बहिणींना दिलं आहे. मात्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यावर तत्काळ वर्ग करा तोपर्यंत शासनाच्या दारातून उठणार नसल्याचा पवित्रा या लाडक्या बहिणींनी घेतला होता. अखेर दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया दिल्यानंतर या लाडक्या बहिणी घरी परतल्या. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणी दाखल झाल्याने गोंधळ उडाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT