Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लूट सुरूच; रेशन कार्ड अपडेटसाठी होतेय पैशांची मागणी

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ट आवश्यक आहे. त्याचं काम करण्यासाठी बुलढाण्यात पैशांची मागणी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Sandeep Gawade

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी नागरिकांनी बुलढाणा तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयासह इतर ठिकाणी गर्दी केली आहे. या तहसील कार्यालयात रेशन कार्डमध्ये नाव टकणे. नाव वगळणे आणि ऑनलाईन करणे ही कामे केली जात आहेत. मात्र तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील कर्मचारी कडून राशन कार्डचं कामासाठी 50 ते 100 रुपये घेतल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हिडिओही कॅमेरात कैद झाला आङे. साम टीव्हीचे पत्रकार कॅमेरा घेऊन कार्यालयात गेले असता त्याठीकाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला. मात्र आता यावर जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जात नाही, हे सर्व सेवा विनामूल्य आहे. जर असा कोणताही ऑपरेटर वसुली करीत असेल तर त्यावर् नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया.. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT