mudkhed to nanded road closed for vehicles Saam Digital
महाराष्ट्र

Mudkhed To Nanded Road Closed: मुदखेड ते नांदेड रस्ता वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या कारण

Water released from isapur dam : गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. बहुतांश ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यातील सीता नदीला कॅनॉलचे पाणी सोडले आहे. या पाण्यामुळे मुदखेड ते नांदेड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी, वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नांदेड ते मुदखेड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे.

इसापूर धरणातील पाणी कॅनॉल मार्फत मुदखेड तालुक्यातील सीता नदीला सोडण्यात आले. या पाण्यामुळे शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु या पाण्यामुळे पुलाच्या बाजूला तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग खचला आहे. त्यामुळे नांदेड ते मुदखेड मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला आहे. वाहुतकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक्स्प्रेसवेववर भीषण अपघात! भरधाव ट्रकने लोकांना चिरडले; ३ जणांचा जागीच मृत्यू

Avneet Kaur Photos: अवनीत कौरचा हटके अंदाज, ब्लॅक ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Face Care after Diwali: दिवाळीनंतर मेकअपमुळे चेहरा खराब झालाय? मग 'हा' घरगुती फेसपॅक वापरुन चेहरा होईल क्लिन आणि ग्लोईंग

Heart Attack: रात्री किंवा पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असतं? काय आहे कारण?

Shocking Crime News : भरदिवसा व्यावसायिकाचं अपहरण, सराफाला नग्न करून मारहाण, ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटली

SCROLL FOR NEXT