Shivaji Maharaj Controversial statement off Rahul Solapurkar  SaamTv
महाराष्ट्र

Rahul Solapurkar : शिवरायांवर एक चित्रपट काढल्याने मराठ्यांचा इतिहास कळत नाही - मुधोजी राजे भोसले

Mudhoji Raje Bhosale on Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर हे अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, त्यांनी आपल्या मर्यादा ओळखाव्यात, असेही नागपूरकर भोसले राजघराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : राहुल सोलापूरकर सारख्या एखाद्या अभिनेत्याने शिवरायांवर एक चित्रपट काढल्यामुळे त्यांना मराठ्यांचा इतिहास कळत नाही'' अशी टीका नागपूरकर भोसले राजे घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. राहुल सोलापूरकर हे अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, त्यांनी आपल्या मर्यादा ओळखाव्यात, असेही नागपूरकर भोसले राजघराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितलं आहे.

राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याने अशी कृती केलेली नाही. त्यामुळे राहूल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात माफी मागावी, अशी मागणीही मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या पूर्वजांनी धर्म बदलून औरंगजेबाच्या घरी धुणीभांडी केली असावी. त्यांनीच राहुल सोलापूरकर यांना त्या काळातील घटना सांगितल्या असाव्यात, असा उपरोधिक टोला मुधोजी भोसले यांनी लगावला आहे. औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रू शिवराय होते. अशा परिस्थितीत आपल्या सुल्तानाच्या सर्वात मोठ्या शत्रूकडून लाच घेणे वजीराला शक्य झाले असेल का? असा सवालही मुधोजी राजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

दरम्यान, राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन बऱ्याच राजकीय नेत्यांच्या संतापजनक प्रकिया येत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी (शप) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट (एक्स) करत आपली प्रतिक्रिया दिली होती. आव्हाड म्हणाले होते की, हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT