Latur Bus station दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

एसटी कामगारांचा 5 महिन्यांचा पगार आता बुडीत खात्यात !

काम नाही तर दाम नाही, प्रशासनाची भूमिका

दीपक क्षीरसागर

लातूर: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण (Merger) करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबर २०२१ पासून पुकारण्यात आलेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना आता काम नाही तर दाम नाही. या धोरणानुसार पगार मिळाला नाही. परिणामी, कर्मचारी, कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत. बँकेकडून (bank) घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आणि व्याजाचे हप्तेही वाढले आहेत.

हे देखील पहा-

वेतनाअभावी होणारी उपासमार, प्रपंच कसा चालवायचा? या विवंचनेत अडकलेले कामगार टप्प्याटप्प्याने कामावर परतले. तर काही कामगार वेतनवाढ (Pay rise) मिळाल्याच्या निर्णयानंतर कामावर परतले. यातून डिसेंबरपासून टप्प्या- टप्प्याने लालपरी आगाराबाहेर पडली. आता लातूर (Latur) विभागातील पाचही आगारातून १९१ बसेस सुसाट आहेत. २२ एप्रिलपर्यंत काही कर्मचारी कामावर हजर होतील.

संप काळात अनेक कर्मचाऱ्यांनी काम केले नसल्याने आता मागील काळातील पगार मिळणार का अशी चिंता एसटी कामगारांना (workers) सतावत आहे, तर काम नाही तर दाम नाही. या धोरणानुसार एसटी कामगारांना संपकाळातील पगार मिळणार नाही. ज्या तारखेला कामगार कामावर परतील, तेव्हापासून शासनाने जाहीर केलेल्या वाढीसह पगार मिळणार असल्याचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT