St Bus Saam tv
महाराष्ट्र

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचा प्लान करताय? ST महामंडळाकडून खास ऑफर, फक्त 'इतक्या' रूपयांत कुठेही फिरा

ST Bus Launches Diwali Travel Pass: आवडेल तेथे प्रवास योजनेला भरघोस प्रतिसाद. एसटी महामंडळाच्या प्रवासाच्या भाडेदरात कपात. अमर्याद मिळाले फिरण्याची संधी.

Bhagyashree Kamble

  • दिवाळीत फिरण्याची मेजवानी.

  • एसटी महामंडाळाकडून प्रवाशांसाठी खास ऑफर.

  • फक्त 'इतक्या' रूपयांत कुठेही फिरा.

अवघ्या १३ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीत सण साजरा केल्यानंतर काही जण फिरायला जातात. तर, काही जण पर्यटनस्थळ गाठतात. पण प्रायव्हेट कंपनीच्या वाहनातून प्रवास करताना खर्च फार होतो. जर आपल्याला तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे, आणि इतर प्रेक्षणीय स्थळे कमी पैशात पहायचे असतील तर, एसटीतूनही आपण प्रवास करू शकता.

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांना मनसोक्त फिरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या भाडेदरात कपात केली आहे. किमान २२५ ते कमाल १ हजार २५४ रूपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली होती. जानेवारी महिन्यात १५ टक्के भाडेवाढ करण्यात आले होते.

दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचाही निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील पुरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केलीय. आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना कमी दरात फिरता येणार आहे.

प्रोढ तसेच लहान मुलांसाठी ४ आणि ७ दिवस अशा स्वरूपात पास मिळेल. महामंडळातील एसटी रातराणी, शिवशाही, ई- शिवाई, शिवनेरी अशा बसेसमध्ये या योजनेतून मिळणारे पास ग्राह्य धरले जाईल. या पासद्वारे प्रवाशांना अमर्यादित प्रवास करता येईल.

आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत भाडेदर

साधी बस

४ दिवस (प्रौढ) - जुने दर (१,८१४), नवे दर (१,३६४).

४ दिवस (मुले) - जुने दर (९१०), नवे दर (६८५).

७ दिवस (प्रौढ) - जुने दर (३,१७१), नवे दर (२,३८२).

७ दिवस (मुले) - जुने दर (१,५८८), नवे दर (१,१९४).

शिवशाही

४ दिवस (प्रौढ) - जुने दर (२,५३३), नवे दर (१,८१८).

४ दिवस (मुले) - जुने दर (१,२६१), नवे दर (९११).

७ दिवस (प्रौढ) - जुने दर (४,४२९), नवे दर (३,१७५).

७ दिवस (मुले) - जुने दर (२,२१७), नवे दर (१,५९०).

ई- शिवाई

४ दिवस (प्रौढ) - जुने दर (२,८६१), नवे दर (२,०७२).

४ दिवस (मुले) - जुने दर (१,४३८), नवे दर (१,०३८).

७ दिवस (प्रौढ) - जुने दर (५,००३), नवे दर (३,६१९).

४ दिवस (मुले) - जुने दर (२,५०४), नवे दर (१,८१२).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT