JUNNAR ST BUS ACCIDENT: 2 DEAD, 17 INJURED AFTER SHEGAON-KALYAN BUS OVERTURNS saam tv
महाराष्ट्र

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

ST Bus Accident : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी गावाजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीजवळ एसटी बसचा भीषण अपघात.

  • प्राथमिक माहितीनुसार बस दोन ते तीन वेळा उलटल्याचे सांगितले जात आहे.

  • शेगाव-कल्याण बस दोन ते तीन वेळा उलटली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात १७ जखमी झालेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. गुंजाळवाडी या ठिकाणी एसटी बस उलटल्याने अपघात झाला आहे. भिवंडी आगाराची एस.टी.बस (एम.एच.१४ बी.टी ४०२३) शेगाव - कल्याण ही बस रविवारी( दि.१७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कल्याणला जात होती.

गुंजाळवाडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून आलेल्या एक अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या नादात बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात गेली आणि दोन ते तीन वेळा उलटली या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या ठिकाणी झालेला अपघाताची तीव्रता पहाता स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात स्थळी नागरिकांनी मोठे गर्दी केली होती तसेच अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागला. या अपघात प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

जखमी प्रवाशांची नावे आली समोर

कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७० )

कमल कोंडीभाऊ वाकचौरे (व ६७ दोघे रा बेल्हे)

शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०)

वैशाली शंकर शेजाळ (वय २३ दोघे रा देवडे पंढरपूर)

मगन सुखदेव पाटोळे (वय ४८)

शोभा मगन पाटोळे (वय ३० दोघे रा बुलढाणा)

शारदा बन्सी मेंगळे (वय५९ रा आणे)

अश्विनी गणेश बहिरट (वय ४८ रा आणे)

अलका नामदेव गायकवाड (वय ५८ रा संगमनेर)

अरुण शंकर गुंजाळ (वय ५१ रा बेल्हे)

दिपाली बबन डोंगरे (वय 33 रा डोंगरवाडी)

उल्हास तांबे (वय ७० रा ओतूर)

यमुना यादव पावसे (वय ६० रा हिवरगाव पावसा संगमनेर)

दिव्या संजय पवार (वय २१ रा मानवडी सिन्नर)

सिद्धेश नितीन काळे (वय १०)

आशा नितीन काळे वय ३५)

नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८ सर्व रा पाथर्डी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT