MSRTC Employee Strike Sangli
MSRTC Employee Strike Sangli 
महाराष्ट्र

बस वाहतूक रोखल्याने पोलिस आक्रमक; एसटी कर्मचारी भुमिकेवर ठाम

विजय पाटील

सांगली : सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आक्रमक झाले आहे. पहाटेपासून कर्मचार्‍यांनी संप पुकारत एसटी सेवा ठप्प पाडली आहे. तरीही काही बसेस प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बस वाहतूक रोखली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत बस रोखून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचारी आणि पोलिसांच्यात जोरदार वादावादीचा प्रकारही घडला आहे. MSRTC Employee Strike Sangli Police Saamnews

एसटी कर्मचाऱ्यांनी बस कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे एसटी बस स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांच्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेपासून याठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सांगली बस स्थानकात शुकशुकाट आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदार गाेपीचंद पडळकर यांनी देखील राज्य शासनाने तातडीने मागण्यांबाबत दखल घेतली असती तर ३१ कर्मचा-यांचे जीव वाचले असते. आम्ही एसटी कर्मचारी यांच्या पाठीशी असल्याचे माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानच्या पराभवाचा चौकार! ५ विकेटने पंजाब किंग्सचा विजय

Slovakia PM: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?

SCROLL FOR NEXT