MSRTC Bus News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani : एसटीचे नियाेजन... भाविकांसाठी उरुसात धावणार 30 बस; जाणून घ्या तिकीट दर

30 buses will run to Urus for devotees; Know the ticket price: अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ प्रशासनाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून यात्रा कालावधीत हे नियोजन केले जाते. यासाठी अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले जातात.

राजेश काटकर

Parbhani MSRTC News :

परभणीचे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले हजरत सय्यद शहा तूराबूल हक रहे यांचा 15 दिवस चालणाऱ्या ऊरुस यात्रे निमित्त परभणी आगारातुन शहरात 30 एसटी बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत. बस स्थानकापासून दर्ग्यापर्यंत तिकिटाचा दर दहा रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. (Maharashtra News)

एसटी महामंडळ प्रशासनाने हजरत सय्यद शहा तूराबूल हक रहे यांच्या ऊरुस यात्रेनिमित्त यावर्षी ३० एसटी बसेस परभणी शहरातून यात्रा कालावधीत सोडल्या जाणार आहेत. याकरिता शहरात ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे.

यामध्ये दर्गा परिसरात बसस्थानक राहणार आहे. सोबत मध्यवर्ती बस स्थानक, सोमनाथ मंदिर उघडा महादेव मंदिर परिसर आणि खानापूर फाटा येथून या बसेस धावणार आहेत. शिवाय परभणी विभागातील पाथरी, जिंतूर आणि हिंगोली या ठिकाणाहूनही शटल फेऱ्यांचे नियोजन रात्रीच्या वेळी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता केले जाणार आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत खानापूर फाटा, सोमनाथ मंदिर, मध्यवर्ती बस स्थानक येथून दर्गा परिसरात बसेस धावणार आहेत. दर्गा येथून परतीच्या प्रवासात सुद्धा याच मार्गावर या बसेस दररोज दिवसभरात, रात्री सोडल्या जाणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बस स्थानकापासून दग्र्यापर्यंत दहा रुपये, बस स्थानक ते सोमनाथ मंदिर दहा रुपये तर दर्गा ते खानापूर फाटापर्यंत पंधरा रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ प्रशासनाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून यात्रा कालावधीत हे नियोजन केले जाते. यासाठी अधिकारी, कर्मचारी संबंधित ठिकाणी नियूक्त केले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT