Shivshahi Bus  Saamtv
महाराष्ट्र

MSRTC Bus: 'शिवशाही' बस बंद होणार; खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणारी बस का केली जाणार बंद?

Shivshahi Bus: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस बाबत मोठा घेण्यात आलाय. वाहतुकीच्या स्पर्धेत ही बस अग्रगण्य ठरत होती.

Bharat Jadhav

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने बहुचर्चित 'शिवशाही' बससंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून 'शिवशाही' बसने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोरदार टक्कर दिली होती. आता एसटी महामंडळाचा मोठा ब्रॅण्ड असलेली 'शिवशाही' हळूहळू बंद होणार आहे. शिवशाही' चे रुपांतर 'हिरकणी' बसमध्ये करण्यात येणार आहे. (MSRTC to Gradually Scrap Shivshahi Buses, Introduce Hirkani Fleet in Bid to Rebrand State Transport)

एसटी महामंडळ सर्व 'शिवशाही' बस टप्प्याटप्प्याने 'हिरकणी'मध्ये परावर्तित करणार आहे. यामुळे भविष्यात 'शिवशाही' बस रस्त्यावर धावताना दिसणार नाही. एसटी महामंडळाने वातानुकूलित 'शिवशाही' बस 'हिरकणी' बसमध्ये परावर्तित करण्याचे नियोजन केलंय. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील मध्यवर्ती वर्कशॉपमध्ये 'शिवशाही' बसचं 'हिरकणी' बसमध्ये रूपांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पुण्यातील दापोडी येथे बस परावर्तित केल्या जात आहेत.

का घेण्यात आला निर्णय?

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ७९२ वातानुकूलित 'शिवशाही' बस आहेत. या सर्व बसचे रुपांतर 'हिरकणी'मध्ये करण्यात येणार आहे. 'शिवशाही' बसमधील वातानुकूलित यंत्रणेमुळे इंजिनवर जास्त भार येत होता. त्यामुळे 'शिवशाही'ची वातानुकूलित यंत्रणा बंद करून 'हिरकणी'त परावर्तीत करण्यात येणार आहे.

त्यामुळे इंजिनवरील भार कमी होणार आहे. शिवशाहीच्या रंगसंगतीत बदल करण्यात येणार आहे. याचबरोबर आसनात बदल केला जाणार आहे. 'हिरकणी'मध्ये ४४ आसने असणार आहेत.

शिवशाही मागे साडेसाती

मुंबई–रत्नागिरी मार्गावर १० जून २०१७ रोजी शिवशाही बस सुरू झाली. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून या बस सुरू करण्यात आल्या होत्या. राज्यातील ७५ मार्गांवर शिवशाही धावू लागली. बसमध्ये शयनयान आणि आसन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करणअयात आले होते.

एसटी महामंडळाने प्रवाशांना लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी वातानुकूलित, आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा देण्यात येत होती. मात्र काही वर्षातच शिवशाही बस मागे साडेसाती लागली. होणारे अपघात अन् झालेल्या दुरावस्थेमुळे शिवशाही बस टीकेची धनी बनत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT