NASHIK AC ELECTRIC BUS SERVICE STARTED ON TRIMBAKESHWAR AND KASARA ROUTES Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये धावणार AC इलेक्ट्रिकल बस, दर अर्ध्या तासाने सुरु राहणार सेवा; कसा असेल मार्ग? जाणून घ्या A to Z माहिती

Nashik News : नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ते कसारा मार्गावर नवीन AC इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली आहे. ही सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध असल्याने यामुळे प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये AC इलेक्ट्रिक बस सेवेची सुरुवात

  • त्र्यंबकेश्वर आणि कसारा हे दोन महत्त्वाचे मार्ग जोडले

  • दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध

  • प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित

  • सार्वजनिक वाहतुकीत आधुनिकतेची भर

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ते कसारा या दोन महत्त्वाच्या मार्गांवर नव्या AC इलेक्ट्रिक बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ही बस सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध असणार आहे. सकाळी ५:३० पासून सायंकाळी ७:३० पर्यंत नियमित अंतराने बसेस धावणार असल्याने प्रवाशांना बसची दीर्घकाळ वाट पाहण्याचा त्रास कमी होणार आहे. नोकरदार वर्ग, विद्यार्थी तसेच धार्मिक स्थळांना भेट देणारे भाविक यांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावरील बस नाशिक, महिरवणी, अंजनेरी, पेगळवाडी आणि त्र्यंबकेश्वर या प्रमुख ठिकाणांवरून प्रवास करणार आहे. त्र्यंबकेश्वर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने भाविकांसाठी ही सेवा विशेष सोयीची ठरणार आहे. दरम्यान, नाशिक ते कसारा या मार्गावरही AC इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

या मार्गावर नाशिक, घोटी, इगतपुरी, कसारा आणि कसारा रेल्वे स्थानक या प्रमुख थांब्यांचा समावेश आहे. कसारा रेल्वे स्थानक हे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने या बसमुळे रेल्वे प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. एकूणच, नाशिक शहर आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला या नव्या इलेक्ट्रिक बससेवेने मोठा हातभार लागणार असून, प्रवाशांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT